ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रिपुरा येथील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद अल्पसंख्यांकांच्या मोर्चाला हिंसक वळण

मालेगाव/ त्रिपुरा येथील रॅली मध्ये मोहंमद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काल महाराष्ट्रातील नांदेड,अमरावती आणि मालेगाव या तीन शहरात काढण्यात असलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात यात काही मोर्चे करी आणि पोलीस ही जखमी झाले आहेत,
त्रिपुरा मधील रॅलीत नेमके काय घडले याची माहिती न घेता पैगंबरांच्या अपमानाचा कथित अफवा वाऱ्या सारख्या पसरल्या आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले भिवंडीत १०० टक्के बंद पाळण्यात आला तर अमरावती मालेगाव आणि नांदेड मध्ये मोर्चे काढण्यात आले मात्र या मोर्चा मध्ये घुसलेल्या काही समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली अमरावती मध्ये २२ठिकाणी तोडफोड झाली तर नांदेड मध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली त्यात काही पोलीस जखमी झाले तर मालेगावातील मोर्चात सुधा दगडफेक होऊन काही आंदोलक आणि पोलीस किरकोळ जखमी झाले या तिन्ही मोर्चात एकाच वेळी हिंसा कशी घडली असा प्रश्न केला जात असून गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शांततेचे आव्हान केले आहे

बॉक्स/ तर हिंदूही मोर्चे काढतील/ नितेश राणे
महाराष्ट्रात निघालेल्या हिंसक घटनांच्या नंतर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत भाजपने आज अमरावती बंदचे आव्हान केले आहे तर त्यांचे मोर्चे आणि हिंसा सरकारने रोखले नाही तर हिंदूही मोर्चे काढतील असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय,

error: Content is protected !!