तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेत एकंदर आठ संघ खेळणार असून चार-चार संघांचे दोन गट पाडण्यात आले आहेत. प्रत्येक संघ गटात प्रत्येकी 3 सामने खेळेल, अशी माहिती स्पर्धेच्या आयोजिका अरूंधती घोष यांनी दिली. त्याचप्रमाणे स्पर्धेत फलंदाज, गोलंदाज अष्टपैलू असे तीन वैयक्तिक पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. या स्पर्धेतील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडणरआहे. तसेच युरोपेम इंडियाचे संचालक आणि देशाचे प्रमुख भुवल चंद्र पटेल यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या स्पर्धेत स्पोर्टिंग युनियन क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब, स्पोर्ट्सफिल्ड, विजय क्रिकेट क्लब, पय्याडे क्लब, स्पोर्टंग युनियन ठाणे,दहिसर स्पोर्ट्स क्लब आणि पोलीस जिमखाना हे आठ संघ सहभागी होणार आहेत.स्पर्धेचा उद्घाटनीय सामना स्पोर्टिंग युनियन आणि दहीसर स्पोर्टस् या संघात होईल.