ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पायाला दुखापत होऊनही जनसंपर्क सुरूच – शिवडीत मनसेच्या बाळाचीच जोरदार हवा


मुंबई – [ सोनू जाधव ] आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे . माणसे प्रमु ख राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी लोटत आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारा दरम्यान पायाला दुखापत झाली तरी जनतेशी थेट नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेल्या नंद्गाव्र्र यांनी जनसंपर्क थांबवलेला नाही व्हील चेअरवरून त्यांचा प्रचार सुरु आहे.
१९९५ साली छगन भुजबळ यांच्या सारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून जोइंट किलर ठरलेल्या बाला नांदगावकर यांनी विधानसभेत विविध प्र्शानांवर आवाज उठवला होता. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २००६ साली स्थापना केली तेंव्हा पासून ते राज ठाकरे सोबत एकनिष्ठ शिलेदारासारखे राहिले. मनसेच्या सर्व आंदोलनात भाग घेतला शिवडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी शिवडीत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून ते झोपडपट्टी पुनर्वसना पर्यंत अनेक जनहिताच्या योजना तडीस नेल्या शिवसेना नगरी, दाभोलकर वाडी , मारवाडी वाडी , बारादेवी , राम टेकडी आदी भागातील झोपड पट्ट्यांचे पुनर्वसन त्यांच्याच प्रयत्नातून झाले.राजकारणा पलीकडचा सामन्यातील सामान्य माणूस अशी ओळख असलेले बाला नांदगावकर यंदाही शिव्दीतून निवडणूक लढवीत आहेत . त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी उभे आहेत . पण त्यांच्या विषयी शिवडीतील मतदारांमध्ये असलेली नाराजी व शिवडीतील उमेदवारीवरून शिवसेनेत झालेला अंतर्गत वाद पाहता नांदगावकर यांचा मार्ग सोपा झला आहे अशी चर्चा मतदारांमध्ये सुरु आहे

error: Content is protected !!