ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ प्रकरणी फडणवीस यांची चौकशी

मुंबई/ गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी कशा प्रकारचा कट रचण्यात आला होता याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्या संपूर्ण कटाचा व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह सभापतींना दिला होता त्याबाबत फडणवीसांचा फक्त जवाब नोंदवण्यात आला मात्र त्याचे भाजप कडून सध्या राजकारण केले जात असून जणू काही फडणवीस याना अटक झाली अशा प्रकारे भाजपकडून रस्त्यावर उतरून आक्रोश केला जात आहे या बाबत मुंबईकर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ मध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि पोलिसांनी कशा प्रकारे महाजन याना अडकवण्याचा प्लॅन केला याची माहिती होती मात्र ही गुप्त माहिती फडणवीसांना कुठून मिळाली याबाबत याची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यानुसार फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली मात्र त्या नोटिशीची भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी होळी केली आणि रस्त्यावर उतरून. महाविकास आघाडीच्या विरोधात घोशनाबाजी केली त्यानंतर काल पोलिसांनी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांचा जबाब लिहून घेतला दरम्यान फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्याला या प्रकरणात अडकविण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आले पण आपण त्याला घबरात नाही असे सांगितले मात्र फडणवीस यांच्या चौकशीचे आता भाजपकडून राजकारण सुरू झाले आहे .गल्ली पासून दिल्ली पर्यंत हे राजकारण पसरले आहे फडणवीस यांनी सांगितले की मी याबाबत केंद्रीय गृहसचिव याना सगळी माहिती दिली आहे असे म्हणत गोपनीय माहिती मी नाही तर नवाब मलिक यांनी उघड केली असा आरोप केला आहे .

error: Content is protected !!