ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

फडणवीसांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा -अजित पवार


भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात \५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. २०१७-१८ या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच ५०० कोटींच्या जाहिराती मंजूर केल्या असा आरोप करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुख्य सचिवांनी केलेल्या चौकशीत हे अधिकारी दोषी आढळले आहेत. पण त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, असं पवार यांनी विधानसभेत म्हटले आहे. विद्यमान मुख्यमंत्री यावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या आरोपानंतर आता राज्य सरकार काय उत्तर देणार याचीही उत्सुकता आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशात विरोधक सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त होत आहे

error: Content is protected !!