पाकिस्तानात बलुची आर्मी कडून ट्रेन हायजॅक 200 प्रवाशांसह ४० पाकिस्तानी सैनिक ठार
लाहोर/पाकिस्तानात बळूची आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात जोरदार तमाशा सुरू आहे पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस हायजॅक करून या एक्सप्रेस मधील दोनशे प्रवाशांना ठार केले तर या प्रवाशांच्या सुटकेसाठी आलेल्या पाकिस्तानी लष्करातील 40 सैनिकांनाही ठार मारले या धुमशक्ती 55 अतिरेकी ठार झाल्याचे पाकिस्तानी प्रवक्त्याने सांगितले
जगातील हे सगळ्यात मोठे ट्रेन अपहरण प्रकरण आहे पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तानी सैन्याच्या नाकावर टिचून बलुची आर्मीने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले त्यानंतर दहशतवाद्यांच्या तावडीतून या ट्रेनची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने चहुबाजूने वेळा दिला आणि बलुची आर्मीच्या दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला त्याला बलुची आर्मीच्या दहशतवाद्यांनी ही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले या 40 पाकिस्तानी ठार झाले तर 55 दहशतवादी मारले गेले दरम्यान पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या बलुची कैद्यांना सोडवण्यासाठी हे अपहरण करण्यात आल्याचे बलुची आर्मीने सांगितले असून पाकिस्तान सरकारला दोन दिवसांचा अल्टीमीटर दिला आहे या दोन दिवसात जर पाकिस्तान सरकारने बलुची कैद्यांना तुरुंगातून सोडले नाही तर ट्रेनमधील सर्वच्या सर्व १२८ प्रवाशांना ठार मारू असा इशाराही बलुची आर्मीने दिला आहे सध्या या प्रवाशांना सोडवण्यासाठी बलुची आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे
