किरीट सोमय्या पाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला- सोमय्या पिता पुत्रांवर अटकेची टांगती तलवार
मुंबई/विक्रांत बचाव मोहिमेअंतर्गत जनतेकडून गोळा केलेल्या 58 कोटींच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी किरीट आणि नील या पिता पुत्रंचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे त्या दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे.
2013 मध्ये आय एन एस विक्रांत ही युद्ध नौका भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सेव्ह विक्रांत ही मोहीम हाती घेण्यात आली होती यात सोमय्या त्यांचा पुत्र आणि कार्यकर्ते आघाडीवर होते चर्चगेट स्थानक आणि इतर ठिकाणी उभे राहून त्यांनी निधी गोळा केला होता जवळपास57 कोटी रुपये गोळा केले मात्र हा निधी रजभवणाचा कार्यालयात जमा केला नाही आर टी आय अंतर्गत विचारलेल्या माहितीत ही बाब उघडकीस आली आणि आमच्याकडे असा कोणताही निधी जमा करण्यात आला नाही अशी माहिती राजभवन कार्यालयाकडून लेखी स्वरूपात देण्यात आली आणि ही बाब संजय राऊत यांनी उघडकीस आणली त्यानंतर बबन शिंदे या माजी सानिका मार्फत सोमय्या पिता पुत्रंविरुढ ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असल्याने सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला पण तो फेटाळण्यात आला त्यानंतर काल त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला तसेच काल पोलिसांनी सोमय्या यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीला हजार राहण्याची नोटीस दिली पण दोघेही पिता पुत्र फरार आहेत त्यामुळे त्यांना कोणतीही क्षणी अटक होऊ शकते