मुंबईत आज २७४ कोरोना बाधितांची नोंद
मुंबई – एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. आज मुंबईत नवीन २७४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर२१६ रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी आज 13 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 13 ने वाढून ती १२१वर पोहोचली आहे. तर ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३४ इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ११,५९,८१९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ११,३८,४३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबईत आज कोरोनाच्या एकून २०२६ चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत १,८८,१७,८२१ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
मुंबईत त कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९८. २ टक्के इतका आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे, हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, आजारी असल्यास घरात विलगीकरणात राहणे तसेच श्वसनाचे आजार असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे या गोष्टींचे पालन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.