ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या थापेबाजी पासून सावध राहा – मोदी


नवी दिल्ली -भाजप तिसऱ्यांदा देशात सत्तेत आल्यास भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान ते बदलून टाकतील, असा दावा काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात आहे. भाजपच्या खासदाराचं विधानच त्यासाठी पुरावा म्हणून दिलं जात आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. आम्ही संविधान बदलणार नसल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजस्थानच्या बाडमेर येथील रॅलीतून यावर भाष्य केलं आहे. स्वत: बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान बदललं जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मोदींनी थेट काँग्रेसला उत्तर देत संविधान बदलण्याच्या चर्चांनाच पूर्णविराम दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान हे नुसतं संविधान नाही तर आपल्यासाठी संविधान म्हणजे कुरान, बायबल आणि गीता आहे, असं मोदी म्हणाले. संविधानावर वारंवार चर्चा होते. मोदींचे शब्द लिहून ठेवा, बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधाना बदललं जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपलं संविधान सरकारसाठी गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, कुरान आहे, बायबल आहे. हे सर्व काही आमच्यासाठी आपलं संविधान आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एससी, एसटी, ओबीसी बंधू भगिनीशी अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस सध्या जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा संविधानाच्या नावाने इंडिया अलायन्सवाले खोटं बोलत असतात. ही त्यांची फॅशन झालीय. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केलं, ज्यांनी बाबासाहेबांना भारत रत्न दिलं नाही, ज्यांनी देशात आणिबाणी लागू करून संविधान संपवण्याचं काम केलं, आज ते मोदींना शिव्याशाप देण्यासाठी संविधानाच्या नावाने खोटं बोलत आहेत. मीच देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने तर संविधान दिनालाही विरोध केला होता. हा बाबासाहेब आणि त्यांच्या संविधानाचा अपमान नव्हता काय? आम्ही बाबासाहेबांशी संबंधित पाच तिर्थस्थळांचा विकास केला. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या थापेबाजीपासून सावध राहा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

error: Content is protected !!