ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पावसाळ्यात निवडणुका नको निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती


पालिका निवडणूक सप्टेंबर_ ऑक्टोबरमध्ये
दिल्ली/ आम्ही केंव्हाही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाने अचानक घुमजाव करीत पावसाळ्यात निवडणूक घेणे कठीण आहे. त्यामुळे निवडणूक सप्टेंबर पर्यंत पुढे ढकला अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करायला सांगितले होते . निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचना पूर्ण करायला सनितले पण वेळ कमी असल्याने हे काम ताबडतोब होणे शक्य नाही ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आली . शिवाय पावसाळ्यात मतदानावरही परिणाम होऊ शकतो असे राजकीय पक्षांचे म्हणणे होते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि तशी सर्वोच्च न्यायालयाला तशी विनंती केली आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय .

error: Content is protected !!