धक्कादायक!परमवीर सिंग यंचे निलंबन मागे
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसूल केल्याच्या आरोपामुळे आघाडी सरकारने निलंबीत केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे शिदे फडणवीस सरकारने निलंबन मागे घेतले आहे
परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे संपूर्ण देश हादरला होता संसदेतील दोन्ही सभागृहात याचे पडसाद उमटले होते.त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे त्यांच्यावर इडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती तर दुसऱ्या एका प्रकरणात परमवीर सिंग यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना काही काळ फरार व्हावे लागले होते तसेच त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते पण आता मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि शिंदे सरकार बचावले त्यामुळे परमवीर साँग यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे