ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबईत वादळामुळे ५० झाडे कोसळली ६ जखमी

मुंबई : बिपरजॉय या वादळाचा तडाका मुंबईला बसला. चक्रीवादळ ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहे. वादळ मुंबईपासून दूर गेले असल्याने मुबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वार्‍यामुळे मुंबईत ५० ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉटसर्किट झाल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये एकूण सहाजण जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. उद्याही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. वादळाची दिशा बदलल्याने मुंबईत जोरदार वारे आणि काही ठिकाणी झालेला पाऊस वगळता मोठा फटका बसला नाही. मात्र चक्रीवादळाच्या स्थितीमुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत होता. ही स्थिती उद्याचा दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज असल्याचे मुंबई हवामान विभागाने सांगितले.

मुंबई शहर विभागात १३, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात २७ ठिकाणी झाडे-फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये वर्सोवा अंधेरी येथे झाड अंगावर कोसळल्याने रोहन बार्ला (१७) हा जखमी झाल्याची घटना घडली. त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दहिसर पूर्व येथे मुरबाली तलाव येथे झाड अंगावर कोसळून निशा मिस्त्री (४४) या जखमी झाल्या. त्यांच्यावर मीरारोडच्या भक्तीवेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

error: Content is protected !!