सदाव्रतेच्या कार्यक्रमात नथुराम गोडसेंचा फोटो
मुंबई – आपल्या स्फोटक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या कार्यक्रमात चक्क नथुराम गोडसेंचा फोटो लावण्यात आला त्यामुळे खळबळ माजली आहे
: वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्तेयांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल गुणरत्न सदावर्ते यांना पान्हा फुटला आहे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी उल्लेख करून सदावर्ते यांनी त्यांच्यासोबत न्याय झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्याशिवाय, राज्यातून शरद पवार यांच्या विचारांचा व्हायरस निर्जंतुकीकरण करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सदावर्ते यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पत्रकार परिषद ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच नथुराम गोडसे यांचा फोटो देखील लावण्यात आला.
सदावर्ते यांनी म्हटले की, मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांसोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला. त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानामध्ये केली आहे. मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे यांच्यावरील खटला हा मानवाधिकाराविरोधातील असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील असेही त्यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेत बोलताना, गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आहे. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरस चे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.