ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकीतील चारही मतदार संघातील चित्र स्पष्ट


मुंबई – लोकसभा निवडणूकांनंतर आता राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 1 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने या निवडणुकीसाठी आपली ताकद लावल्याचं दिसतंय.
कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या संजय मोरे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपकडून निरंजन डावखरे हे उमेदवार असतील. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे किशोर जैन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसचे रमेश किर हे उमेदवार असतील.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. शिवसेनेच्या वतीने अनिल परब हे रिंगणात असतील तर विरोधात भाजपचे किरण शेलार हे रिंगणात असतील. या ठिकाणी महायुतीतील शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत यांनी माघार घेतली.
मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे अशी लढत असणार आहे. या ठिकाणी शिवाजी शेंडगे यांनी अपत्र अर्ज भरला आहे तर सुभाष मोरे हे समाजवादी गणराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत
कोकण पदवीधर मतदारसंघ -रमेश किर (काँग्रेस) विरुद्ध निरंजन डावखरे (भाजप) यांच्यात थेट लढत होणार
मुंबई पदवीधर मतदारसंघ-अनिल परब (ठाकरे गट) विरुद्ध किरण शेलार (भाजप
मुंबई शिक्षक मतदारसंघ- जगन्नाथ अभ्यंकर – ठाकरे गट,शिवाजी नलावडे – अजित पवार गट,सुभाष मोरे – समाजवादी गणराज्य , शिवाजी शेंडगे – अपक्
नाशिक शिक्षक मतदारसंघ-किशोर दराडे (शिवसेना शिंदे गट) महेंद्र भावसार (राष्ट्रवादी अजित पवार) विरुद्ध संदीप गुळवे (शिवसेना ठाकरे गट)

error: Content is protected !!