ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गुरू पौर्णिमा

गुरुर ब्रह्मा गूरुर विष्णू
गूरूर देवो महेश्वरा!
गुरू साक्षात परब्रह्म
तस्मेय श्री गुरुयेंनमा!
गुरू पौर्णिमा!याला व्यासपौर्णिमा ही म्हणतात.हिंदू धर्मात आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे.पौराणिक अख्यायिके नुसार भगवान शिव शंकराने सर्व ऋषी मुनिना जे ज्ञानार्जन दिले त्याच्या सन्मानार्थ गुरू पौर्णिमेचा हा दिवस पाळला जातो.तशा गुरू पौर्णिमेच्या बाबत इतर अनेक आख्यायिका आहेत पण गुरूचे पूजन, गुरूचे स्मरण आणि गुरूचे नमन करण्याचा हा पवित्र दिवस आहे.पूर्वी राजे महाराजांच्या काळात गुरुकुळशिक्षण पद्धती होती. त्यावेळी मुलांना गुरुकुलात ठेवले जायचे. आणि गुरुकुलात या मुलांना केवळ युद्ध कलेचेच शिक्षण दिले जात नव्हते तर शिक्षणा बरोबर त्यांना चांगले संस्कार सुधा दिले जायचे .त्यामुळे विद्यार्थी गुरूच्या आज्ञा पाळायचे. त्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्याची सुधा त्याची तयारी असायची.याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाभारतातील धनुर्धारी कर्न! एकदा कर्णाचे गुरू भगवान परशुराम हे कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन विश्रांती घेत होते याच वेळी एका भुंग्याने कर्णाची मांडी पोखरली मात्र प्रंचड वेदना होत असतानाही केवळ आपल्या हालचालीमुळे आपल्या गुरूची झोपमोड होऊ नये म्हणून कर्ण तसाच बसून राहिला त्याने होणाऱ्या वेदना सहन केल्या .तर दुसरीकडे एकलव्या सारख्या शिष्याने गुरूने मागितलेली भयंकर गुरुदक्षिणा त्याने आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या रूपाने दिले.गुरुसाठी वाटेल तो त्याग करणाऱ्या अशा असंख्य शिष्यांची उदाहरणे पौराणिक कथांमधून मिळतात.गुरुकुल शिक्षण पद्धती ही खऱ्या अर्थाने माणसाला एक संस्कारक्षम कर्तव्यदक्ष माणूस बनवणारी होती.पण काळाच्या ओघात गुरुकुल शिक्षण पद्धत संपुष्टात आली.परिणामी गुरूकडून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळू लागले .मात्र चांगल्या शिक्षणा बरोबर जे चांगले संस्कार मिळायला हवे होते ते मात्र मिळू शकले नाहीत.मोठ मोठ्या नामांकित विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने विज्ञानाच्या जोरावर स्वतःची प्रगती केली.पण या ही प्रगती करताना तो नातीगोती आणि माणुसकी मात्र विसरला ज्या गुरूने त्याला इथवर आणले त्या गुरूची जिथे त्याला ओळखच राहिली नाही तिथे गुरू दक्षिणेचा सवांलच कुठे येतो.आणि याला कारण आजच्या विज्ञान युगातील गुरू कडून त्याला केवळ पुस्तकी ज्ञान मिळाले पण त्या पुस्तकी ज्ञानाचा सोबत जे संस्कार मिळायला हवे होते ते मिळू शकले नाहीत .त्यामुळे माणूस श्रीमंत झाला पण तो नातीगोती,माणुसकी,धर्म,कर्तव्य आणि ज्यांनी जन्माला घातले त्या आई वडिलांना सुधा विसरून गेला .ही आहे आजच्या सदोष शिक्षण पद्धतीची शोकांतिका जिने गुरू शिष्यात दरी निर्माण केली त्यामुळे अशा कृतघ्न शिष्याला आज गुरू पौर्णिमा साजरी करण्याचा अधिकार नाही

error: Content is protected !!