ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पूजा खेडकरची चौकशी करण्यासाठी केंद्राकडून चौकशी समिती

नवी दिल्ली – वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या सर्व कारनाम्यांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. यांचे बारामती कनेक्शन असल्याचे समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणले आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याचे ट्विट विजय कुंभार यांनी केलं आहे. ही जमीन आता खेडकर कुटुंबियांनी विकायला काढली आहे. दीड कोट इतकी जमीनीची किंमत आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक ८ मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर १४ गुंठे जमीन आहे.
दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या बाणेर परिसरात असणाऱ्या बंगल्याच्या बाहेर अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती आहे. पुण्यातील बाणेर रोडवर नॅशनल हाऊसिंग सोसायटीत खेडकर यांचा करोडो रुपये किंमतीचा ओम दिप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरात काही भाग हा अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महानगरपालिका खेडकर यांच्या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या बाणेर परिसरात असणाऱ्या बंगल्याच्या बाहेर अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती आहे. पुण्यातील बाणेर रोडवर नॅशनल हाऊसिंग सोसायटीत खेडकर यांचा करोडो रुपये किंमतीचा ओम दिप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरात काही भाग हा अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महानगरपालिका खेडकर यांच्या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!