ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डिजिटल भिकाऱ्याचा सापळासायबरमधील नवीन फ्रॉडपासून सावध

हे वाचून अनेकांना हसायला येईल पण हे सत्य आहे. नंदीबैल घेऊन फिरणारे लोक नंदीच्या शिंगामध्ये ऑनलाईन पेमेंटचा क्यू आर कोड लावून ठेवतात, हे अनेकांनी पाहिले. त्याचे कौतुक पण केले. अनेक मंदिरात सुद्धा हल्ली अशा पेमेंट साठीचे क्यू आर कोड पॅनल ठेवतात. लोकांनाही ते सोयीचे असेल कदाचित.
मात्र आता रोडच्या सिग्नल वर, लोकल ट्रेनमध्ये, बस स्टॅण्डवर, सार्वजनिक ठिकाणी जे भीक मागत होते त्यातले काहीजण आता असे पेमेंट साठीचे क्यू आर कोड पॅनल ठेवत आहेत. तुम्हाला त्यांचे कौतुक वाटते आणि तुम्ही “पहा….. इंडिया कसा डिजिटल होतोय” असं म्हणत त्या आनंदात त्या क्यू आर कोडला स्कॅन करून दहा वीस रुपये जे काय द्यायचे ते पेमेंट करता !
आणि निघून जाता !
मात्र दहा पाच मिनिटात तुमच्या मोबाईलवर तुमच्या बँकेचा मेसेज येतो की, त्या खात्यातून पन्नास हजार / एक लाख रुपये डेबिट झाले आहेत.
किंवा दुसरा सापळा म्हणजे
अजून एक दोन दिवसांनी तुम्हाला मेसेज मध्ये तुमचाच फोटो (मॉर्फ करून) वाईट पद्धतीने क्रिएट करून तुम्हाला पाठवला जातो आणि सांगितलं जाते की हा फोटो आम्ही सोशल मीडिया वर किंवा तुमच्या नातेवाईकांना पाठवू नये असं वाटत असेल तर अमुक एका नंबरवर पन्नास हजार / एक लाख रुपये पाठवा !
तुम्ही घामाघूम होता. पॅनिक होता.
कारण तुम्हाला तुमचे पैसे जितके मोलाचे तितकीच “इज्जत” पण महत्वाची असते न ?
मग त्यासाठी तुम्ही मजबुरीने त्या लोकांना पैसे देऊन मान मोकळी करून घेता ! पण तिथेच फसता ! कारण अजून काही दिवसांनी दुसऱ्याच नम्बरवरून मेसेज येतो आणि तुम्हाला तुमचेच वाईट पद्धतीने क्रिएट केलेले फोटो पाठवून पुन्हा पैशाची मागणी केली जाते.
आणि असेच तुम्ही भरडले जाता ! आणि लाखो रुपये घालवून बसता.
यामागे नवीन एक सायबर भामट्याची टोळी काम करतेय. ते सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्या मुलांना हाताशी धरून असे क्यू आर कोड चे पॅनल देत आहेत. त्या बिचाऱ्या मुलांना त्यातलं फारसे काही कळत पण नाही. मात्र हे सायबर भामटे त्यांना अमिश देतात की, “तू दिवसाला किती कमवतो ? तर समजा शंभर रुपये. आम्ही तुला तीनशे रुपये देतो. तू फक्त आमचे हे क्यू आर कोड पॅनल लोकांना दाखवून भीक (पैसे) मागायचे
लोकही कौतुकाने पेमेंट करतील ! बाकी तुझे तुला तीनशे मिळतील !”
मग ती बारकी पोरे याला बळी पडतात अन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सायबर भामटे तुम्हाला गंडवतात !
कसे गंडवतात ?
तर तो जो क्यू आर कोड असतो न त्यातच इनबिल्ट मालवेयर (व्हायरस) टाईपचे सॉफ्टवेयर असते, जे तुम्ही तो कोड स्कॅन केला की तुमच्या मोबाईलमध्ये घुसतो,.
आणि तुमचा फोन हॅक होतो
त्यात काय काय घडू शकते ?
१) तो मालवेयर जर “एनी डेस्क” टाईपच्या जातीतला असेल तर तुमचा पूर्ण मोबाईल चा ऍक्सेस समोरच्याला जातो आणि मग तुमचे सगळं व्यवहार, फोटो गॅलरी, जी पे अकाउंट डिटेल, बँक डिटेल्स त्याच्या हाती पडतात आणि त्यातून मग तुम्हाला लुटले जाते
२) गॅलरी मधील फोटो वापरून मॉर्फ करून तुम्हाला ब्लॅक मेल केले जाते आणि पैशाने उकळले जाते !
इतकं सगळं भीषण आहे.
मग आता यावर उपाय काय ?
डॉ. डीडी क्लास : यावर उपाय सोप्पा आहे. तुम्हाला त्या भिकाऱ्यांची फारच दया आली तर आधीच्या काळी जसे कॅश (नाणी / नोटा) देत होता तसे याना द्या ! त्यांचा क्यू आर कोड स्कॅन करू नका ! इतकं सिम्पल आहे. कौतुकाने तुम्ही ते पेमेंट ओनलाईन करायला जाता आणि त्याचा सेल्फी काढून मारे जोशात “ये नया इंडिया है” असं म्हणत तो फोटो सोशल वर टाकता ! येड्याहो….. तुम्ही स्वतःच उल्लू बनलेले असता अन तुम्हालाच माहित नसत ते !

तर मंडळी,. विचार करा ! मी तर आजवर कधीच भिकार्याला अशी कॅश / नोटा ची भीक दिली नाही. माझ्या तत्वात ते बसत नाही. त्यापेक्षा मी त्यांना त्यातून बाहेर काढून पायावर कसे उभे करता येईल हे पाहतो आणि तसे त्यांना चांगले जीवन देण्याचा प्रयन्त करतो. आजवर कैक लोक त्यामुळेच त्यातून बाहेर पडून स्वाभिमानाने जगत आहेत. भिकार्याला भीक देऊन त्याला तुम्ही अजून आळशी करताय ! हे नक्की

शिवाय आता मी जे बोललो की, भिकाऱ्याच्या नावावर सायबर भामटे सक्रिय झाले आहेत, तेही धोक्याचे आहे. तो विचार करा अन सावध व्हा !

error: Content is protected !!