ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने रोखली विद्यार्थ्यांची वाट

आणखी किती दिवस त्यांच्या तालावर नाचणार आहात? पालकांचा संतप्त सवाल
मुंबई/ गेल्या सव्वा वर्षा पासून कोरोंनाच्या भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ्खंडोबा झालाय .मात्र आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे .त्यामुळे सरकारने १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली मात्र सरकारच्या या कृतीवर विद्यार्थी आणि पालक संतापले असून आणखी किती दिवस टास्क फोर्स च्या तलवार नाचणार आहात असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. टास्क फोर्स च्या विरुद्ध जनतेत किती नाराजी आहे त्याचेच हे उदाहरण आहे.
कोरोंनाच्या सर्वात जास्त प्रादुर्भाव मार्च २०२० पासून होता . तेंव्हापासून शाळा कॉलेज बंद आहे दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑन लाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला मात्र ग्रामीण भागात काही मोबाईल कंपन्यांच्या कार्डला नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑन लाईन अभ्या करता येत नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र २०२१क्या एप्रिल मे नंतर हळू हळू परिस्थितीत सुधारणा होऊ लागली कोरोंनाच्या दुसरी लाट असल्याने निर्बंध होते पण नंतर कोरोंना रुग्णांची संख्या घटू लागली त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले पण तरीही दहावी आणि भरवाची परीक्षा सरकार घेऊ शकले नाही कारण प्रत्येक वेळी टास्क फोर्स कडून तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जात होते त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा न घेता मुलायक्वार लावण्यात आले ते विद्यार्थी आणि पालकांनाही आवडले नव्हते .दरम्यान जुलै महिन्यात रुग्ण संख्या घातल्याने २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करून दुकाने,कार्यालये,आणि काही व्यापार उद्योगांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आणि चार दिवसांपूर्वी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची सुधा परवानगी देण्यात आली पण शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जे प्रयत्न सुरू होते त्याच्या आड टास्क फोर्स येत होती तरीही शिक्षण मंत्र्यांनी १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तसा जी आर सुधा काढला पण पुन्हा टास्क फोर्स वाले काळया माजरासारखे आडवे आले आणि तिसऱ्या लाटेची भीती दाखवू लागले. विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसल्याने इतक्यात शाळा सुरू करू नका असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि मुख्यमंत्री तर त्यांच्या सल्ल्याची अमबाजवणी करायला एका पायावर तयार असतात. त्यामुळे त्यांनी टास्क फोर्स चे म्हणणे ऐकले आणि शाळा सुरू करण्याच्या जी आर ला स्थगिती देण्यात आली त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संतापले आहेत शिक्षक सुधा नाराज आहेत .सगळ्याच गोष्टी जर टास्क फोर्स च्या सल्ल्याने चालणार असतील तर सरकार हवेच कशाला अशी संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत
.

error: Content is protected !!