गणेशोत्सव मंडळांना मोफत सर्व परवानग्या देऊन एक खिडकी योजना सुरू करा
मुंबई/ गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोंनाचे सावट असल्याने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध सरकारने लावले आहेत तसेच हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे सांगितले आहे.मात्र सरकारकडून गणेशोत्सव मंडळांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही उलट उत्सव मंडळाच्या उत्पन्नाचे सोर्स असलेले जाहिरातीचे माध्यम सुधा कडून घेण्यात आले आहे हा एक प्रकारे अन्य असून निदान आता उत्सवासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या तरी मोफत द्याव्यात आणि त्या सर्व एक खिडकीवर मिळाव्यात जेणेकरून उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक परवानगीसाठी धावाधाव करावी लागणार नाही अशी मागणी माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी केली आहे
गणेशोत्सवासाठी मंडप,विद्युत रोषणाई,ध्वनिक्षेपक आदी साठी वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात त्यात बराचसा वेळ आणि पैसाही जातो .यावेळी कोरोंनामुळे गणेशोत्सवाची वर्गणी देणग्या आणि जाहिरातींवर परिणाम झाला आहे परिणामी काही उत्सव मंडळांना एफ डी तोडून तसेच स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून खर्च करावा लागणार आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळे आर्थिक संकटात आहेत म्हणूनच सरकारने त्यांच्यावर आणखी बंधने न लादता विविध परवानग्या उत्सवच सात दिवस अगोदर एक खिडकीवर दिल्या जाव्यात.तसेच मंडपणा मोफत परवानगी दिली जवी अशी मागणी बाबूभाई भवानजी i यांनी केली आहे.