राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत
काल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की आम्हाला जातीयवादी ठरवण्यापूर्वी राजने त्याचे आजोबा प्रोबधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचावीत म्हणजे त्यांना कळेल की महाराष्ट्रात जातीयवाद कोणामुळे वाढला.