ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिंदे गट दादर मध्ये बांधणार प्रती शिवसेना भवन

मुंबई/ महाविकास आघाडीचे सरकार पाण्यात यशस्वी ठरलेल्या शिंदे गटाने आता आपली नजर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर नजर वळवली असून त्यासाठी शिंदे गट मुंबईत प्रती शिवसेना भवन बांधणार आहे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ही माहिती दिली
दरम्यान मुंबईत शिंदे गटाची पाळेमुळे घट्ट रुजवण्यासाठी सर्वत्र शाखा उघडण्यात येणार आहेत आणि शिवसेनेत नाराज असलेल्या लोकांना शिंदे गटाच्या शाखांचे दरवाजे उघडे असतील त्यामुळे मुंबईत शिंदे गटाची ताकत वाढणार आहे आणि त्यातून उद्वव ठाकरेची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात राडेबाजी होण्याची शक्यता आहे
दरम्यान आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेऊन कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे सांगितले

error: Content is protected !!