ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी

शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी

जळगावात गुलाबराव पाटलांची स्वागत यात्रा

मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात किमान पंधरा ठिकाणी पाटलांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे. त्यामुळे आज शक्तिप्रदर्शनरूपी स्वागतयात्रेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लागणार आहे.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणून ते प्रथमच आपल्या मतदारसंघात प्रवेश करीत असल्यामुळे आज शनिवारी त्यांच्या मतदारसंघातच नव्हे तर अवघ्या जळगाव जिह्यात त्यांचे जोरदार स्वागत करून शक्तिप्रदर्शन दाखविण्यासाठी त्यांचे समर्थक सज्ज झालेत. मंत्री पाटील सकाळी मुंबईहून जळगावला निघाले असून ते दुपारी 2 पर्यंत अमळनेर गाठतील आणि तेथूनच त्यांची भव्य आणि दिव्य स्वागतयात्रा पूर्ण जिल्ह्यात निघेल. अंमळनेरपासूनच तब्बल चारशे गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्ते त्यांचा स्वागतयात्रेबरोबर असतील आणि हा ताफा जसजसा पुढे सरकेल तसतसा हा ताफा आणखी विशाल होणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. या स्वागतयात्रेत केवळ मंत्री गुलाबराव पाटलांचे स्वागत होणार नाही किंवा ते नुसतं आभार प्रदर्शन करणार नाहीत. या यात्रेत जागोजागी त्यांची तोफही धडाडणार आहे.

error: Content is protected !!