कोकणी माणसाला चुतिया म्हणणाऱ्या मुनव्वर फारुकीला तुडवणाऱ्याला समाधान सरवणकर कडून १ लाखांचे बक्षीस
मुंबई – ज्या कोकणी माणसाने आपल्या विविध कलागुणांनी देशाचे नाव उज्वल केले महाराष्ट्राची आणि देशाची कीर्ती सातासमुद्राच्या पलीकडे पोहचवली त्या कोणी माणसाला चुतिया म्हणणाऱ्या कॉमेडियन मुनव्वर फारुकी विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून मनसेने त्याला माफी माग नाहीतर नाहीतर माणसे स्टाईल डंका देऊ असा इशारा दिला आहे
बिग बॉस हिंदी सीझन १७ चा विजेता आणि स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकी हा पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुनव्वर फारुकीने यावेळी आपल्या स्टॅंडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल बोलताना अपशब्दाचा प्रयोग केल्यामुळे तो आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मनसेकडून मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे मुनव्वरला जो तुडवेल त्याला एक लांखाचे बक्षीस, असं समाधान सरवणकर म्हणाले आहेत. तर या मुनव्वरला लवकरच मनसेचा दणका बसेल, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृतकडून फेसबुकवर करण्यात आली आहे.
मुनव्वरने कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर या पाकिस्थानप्रेमी मुनव्वरला जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार. कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे. याला जो तुडवेल त्याला एक लाखांचे बक्षीस. येवो कोकण आपलंच असा, असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा बोलतात”, अशा तिखट शब्दांत समाधान सरवणकर यांनी निशाणा साधला आहे