ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

अति.पो.आयुक्त प्रविण पडवळ यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची आज मुंबईला गरज- तरुण ७८ युवतींना सोडवण्यात यश

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : तीन दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात रहाणा-या एका हिंदू युवतीला फसवून मुस्लिम समाजातील एका युवकाने पळवून नेल्याचा प्रकार घडला. घडलेला प्रकार कांदिवली पोलिस ठाण्याचे अति.आयुक्त. प्रविण पडवळ यांना भाजपाचे वरिष्ठ नेते आर. यु. सिंह यांनी निदर्शनास आणून देताच ह्या कार्यक्षम आधिका-याने आपली सर्व शक्ती -युक्ती कामाला लावत अवघ्या तीन दिवसांत ह्या पळवून नेलेल्या युवतीला हैद्राबाद येथून सहीसलामत सोडवून तिच्या आई-वडिलांच्या हाती सूपूर्द केले. अति.आ.प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. राजकीय जीवनांत काम करत असतांना पोलिसांबरोबर अनेक वादाचे प्रसंग येतात परंतु चांगले कामे करणाऱ्या पोलिस आधिकाऱ्यांचे कार्य समाजापुढे येणेही तितकेच गरजेचे आहे. या वर्षभरात अशाप्रकारे फसवणूकीचे १०३ प्रकार घडले असून त्या पैकी ७८ युवतींना यातून सोडवण्यात मुंबई पोलिसांना यश आले असल्याची माहिती पडवळ यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिली. मुंबईच्या बिघडलेल्या कायदा व सुरक्षे बद्दल चिंता व नाराजी व्यक्त करुन मुंबईतल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रविण पडवळ यांच्या सारख्या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी या सत्कार प्रसंगी बोलतांना केले. चांगल्या कामांसाठी पोलिस व लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असेही मत शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. तरुण युवतींची फसवणूक टाळण्यासाठी सर्वच पालकांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

error: Content is protected !!