ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुरब्बी राजकीय पहिलवान


उत्तर भारतातील जातीय राजकारणात टिकून राहणे आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे वाटते तितके सोपे नाही.पण ज्या काही नेत्यांनी हे करून दाखवले त्यात मुलायमसिंग यादव यांचाही समावेश आहे.ग्रामीण भागातील मातीशी नाल जोडलेला एक पहिलवान गडी भविष्यात राजकारणात येवढं नाव कमवेल असे त्यांच्या कुटुंबिय तसेच आप्तेष्टांना सुधा वाटले नव्हते .कारण समाजवादी विचार सर्णीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणे आणि वातावरण पाहून आवश्यकतेनुसार आपल्या राजकीय भूमिकेत बदल करणे.राजकारणात बदलत्या काळाची पाहिले ओळखून त्यानुसार चालणे हे फक्त या देशातील दोनच नेत्यांना जमले एक शरद पवार आणि दुसरे मुलायमसिंग यादव! 22नोव्हेंबर 1939 आली उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफयी सारख्या छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडीलानी त्यांना पेहलवान बनवले होते त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचा कुस्तीच्या आखड्याकडे कल होता त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना लोळविले त्यामुळे याच क्षेत्रात त्यांनी करियर करावे असे त्यांचं वडिलांना वाटत होते पण विद्यार्थी दशेपासूनाच त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा होता त्यामुळे त्यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आणि काही काळ प्राध्यापकी केली पण तिथे त्यांचे मन रमेना आपल्याला जनतेसाठी काहीतरी करायचे आहे ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी रामसेवक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले आणि 19 67 सालि पहिल्यांदा विधांनसभेची निवडणूक लढवली आणि निवडून आले. मुलायमसिंग यादव हे तीन वेळा उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री होते तसेच ते केंद्रात संरक्षण मंत्रीही होते 8 वेळा आमदार आणि 7 वेळा खासदार असे दीर्घकाळ लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या मुलायमसिंग यादव यांची प्रशासनावर घट्ट पकड होती . त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी कधीही प्रशासनाला हावी होऊ दिले नाही .एखादी गोष्ट त्यांना पटत नसेल तर प्रशासनाच्या प्रोटोकॉल ची सुधा ते परवा करीत नसत.

एकदा हेलिकॉप्टर मधून ते पूरग्रस्त भागाचा दौरा करीत असताना एका ठिकाणी त्यांना काही लोकांचा मोठा जमाव दिसला लोक गुडघाभर पाण्यात उबे राहून आभाळाकडे पाहत कुणी मदतीसाठी येतंय का याची वाट बघत होते मुलायम सिंग यादव यांनी पायलटला हेलिकॉप्टर खाली घ्यायला सांगितले त्यावर पायलट म्हणाला गुडघाभर पाण्यात लँडिंग कशी करणार आणि हे प्रोटोकॉलचा भंग करणारे ठरेल त्यावर मुलायम म्हणाले तू फक्त पाण्याच्या पातळी पर्यंत हेलिकॉप्टर खाली घे मी तिथून खाली उडी मारतो आणि माझे काम झाले की तसेच तेवढ्याच पातळी पर्यंत हेलिकॉप्टर आणि मी त्यात कसाही चढून दाखवून पायलटच नाईलाज होता त्याने मुलायमसिंग यांनी सांगितले तेच केले आणि हेलिकॉप्टर पाण्याच्या पातळीपर्यंत आणले त्यानंतर जवळपास 9 फूट उंचीवरून त्यांनी खाली पाण्यात उडी मारली आणि पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना भेटले त्यांना प्रशासनाकडून मदत मिळवून दिली .त्यांनी 1922 आली समाजवादी पक्षाची स्थापना केली पण त्यांच्या उतारवयात कौटुंबिक वादामुळे त्यांचे आणि त्यांच्या समाजवादी पक्षाचे खूप नुकसान झाले आणि हेच शल्य त्यांना अखेरपर्यंत टोचत होते . आज ते जरी नसले तरी त्यांचे कार्य आणि सर्वांशी सलोख्याने वागण्याची त्यांची पद्धत आज राजकीय क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श ठरेल .

error: Content is protected !!