ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून महाडेश्वर ? – लटकेंचा राजीनामा लटकला

मुंबई/ शिवसेनेने अंधेरी पूर्व विधासभा पोट निवडणुकीसाठी भलेही दिवंगत रमेश लटके यांचा पत्नीला उमेदवारी दिलेली असली तरी त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण त्या पालिका कर्मचारी असून त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना जी अट घातली होती तीच अट त्यांच्या उमेदवारीच्या मुळावर आली असून पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नसल्याने त्या उमेदवारी अर्ज दाखल करू शकत नाहीत . त्यामुळे शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वर यांचा पर्याय तयार ठेवला आहे .
अंधेरी पूर्व चे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके याना उमेदवारी दिली आहे पण त्या पालिका कर्मचारी असल्याने त्यांना राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लढवता येत नव्हती त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . मात्र राजीनाम्याच्या अर्जात त्यांनी म्हटले होते की या निवडणुकीत माझा पराभव झाला तर मला पुन्हा सेवेत घ्यावे त्यांच्या याच अटीमुळे पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही लटकवून ठेवला आहे आणि त्यावर निर्णय घ्यायला महिना लागेल असे सांगितले गेले आहे . त्यामुळे शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 2 दिवस आहेत त्यामुळे लटके यांचं बाबतीत पालिकेने 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर त्यांच्या ऐवजी माझी महापौर विश्वनाथ महाडेश्वर याना उमेदवारी दिली जाणार आहे .

error: Content is protected !!