राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्र्यात गोळ्या घालून हत्या
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, आज एका मोठ्या नेत्याची हत्या करण्यात आली .काँग्रेस मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची, बांद्राच्या खेरवाडी जंक्शन जवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे मुंबईत प्रचंड खळबळ मारली असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते .
बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा सिझान सिद्दिकी याच्या कार्यालयातून बाहेर पडून जात असताना, अचानक आलेल्या हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर सहा राउंड गोळीबार केला. यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. तर एक गोळी त्यांच्यासोबत असलेल्या माणसाच्या पायात घुसली. बाबा सिद्धी यांची गाडी बुलेट प्रूफ असतानाही एक गोळी गाडीच्या काचेत घुसली. यावरून हल्लेखोरांकडे अत्याधुनिक पिस्तूल असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. बाबा सिद्दिकी यांना गोळ्या घातल्यानंतर हल्लेखोर पळून जात असताना, जमावाने त्यांना पकडले. दोन आरोपींना घटनास्थळीच पकडण्यात आले तर एकाला पुन्हा अटक करण्यात आल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ माजली. ही हत्या कोणी आणि कशामुळे केली याचा आता पोलीस शोध घेत आहे. बाबा सिद्दिकी हे काँग्रेसचे जुने नेते होते. आणि त्यांचे उत्तर पश्चिम चे माजी खासदार अभिनेते सुनील दत्त यांच्याशी घनिष्ट संबंध होते .मात्र त्यांच्या निधन नंतर बाबा सिद्दिकी काँग्रेसमध्ये काहीशी एकाकी पडले होते त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु त्याचा मुलगा हा मात्र अजूनही काँग्रेसमध्ये आहे .विशेष म्हणजे या हल्ल्याच्या वेळी देवीची मिरवणूक जात होती आणि फटाके व इतर वाद्य वाजत होटी त्याचाच फायदा घेऊन हल्लेखोराणी गोळीबार केला असे सांगितले जात आहे.