ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

उन्मत्त कट्टरपंथी आणि पोकळ निधर्म वाद!

भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.

error: Content is protected !!