राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई/ राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून विश्वास नांगरे पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.
मिलिंद भारंंबे नवी मुंबईचे आयुक्त
विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी झाली आहे. तर वाहतूक पोलिस सह आयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे. विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील.
अमरावतीच्या आयुक्त डॉ. आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये बदली
अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी आता नविनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त असतील. अमरावतीत डॉ. आरती सिंह यांची कारकीर्द गाजली. आरती सिंह यांची बदली करण्यात यावी यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत तक्रारही केली होती.
अमिताभ गुप्ता यांच्या जागी रितेश कुमार
अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन बदली झाली असून त्यांना कायदा व सुव्यवस्था, अपर पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी रितेश कुमार आता पुण्याचे नवे आयुक्त असतील.