मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे समझोता एक्सप्रेस
मुंबई/ राजकारणात कधी कधी काही मिळवण्यासाठी किंवा मिळवलेले टिकवण्यासाठी मनात नसतानाही तडजोडी कराव्या लागतात मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे तडजोडीचे राजकारण बघायला मिळाले ते एका दिवसात घडलेले नव्हते. त्याची पटकथा फार पूर्वी लिहिलं गेली असावी त्यामुळं तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो म्हणजे दोघांचीही प्रतिष्ठा टिकून राहील अशा पद्धतीची व्यूहरचना या निवडणुकीत करण्यात आली होती म्हणून तर अध्यक्षपद सेना राष्ट्रवादी युतीला आणि उपाध्यक्षपद म्हणे ईश्वर चिठ्ठी मुळे भाजपला मिळाले मात्र हा सगळा बनाव होता असा गंभीर आरोप मुंबई बँकेच्या काही खातेदारांनी केला आहे.मुंबई बँकेत प्रवीण दरेकर यांचे मोठे योगदान आहे. ते हुशार आणि अभ्यासू नेते आहेत. शिवाय गोरगरिबांना मदत करण्याची त्यांची दानशूर वृत्ती आहे त्यामुळेच त्यांच्या पाठीशी मोठा जनसमुदाय आहे आणि हेच काही लोकांच्या नजरेत खुपत होते म्हणून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी अगोदर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर पद्धतशीरपणे संचालक मंगळावरून त्यांना हटवण्यासाठी महाविकास आघाडी मधील शिवसेना राष्ट्रवादीने युती केली आणि ही युती करून भाजपशी सुधा हातमिळवणी केली त्यामुळेच राष्ट्रवादीला अध्यक्षपद आणि भाजपला उपाध्यक्ष पद मिळाले व दोघांचीही बँकेवरील पकड आणि प्रतिष्ठा कायम राहिली अन्यथा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला ११ मत मिळतात आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १० मते मिळतात हे पटण्यासारखं आहे का? ही निवडणूक म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय समझोत्याचे एक मोठे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया काही खातेदारांनी व्यक्त केली आहे.