ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मोबाईल व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या८० पेक्षा अधिक सेवा सुविधांचे लाभ*

२४ तास ही सुविधा उपलब्ध

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.
• तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही.
• मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे
• वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे.

मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द
• या द्वारे मुंबईकराचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न
• आज हे जगातील एकमेव उदाहरण असेल की ८० पेक्षा जास्त सुविधा आपण नागरिकांना देत आहोत
• ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भाषणातील मुद्दे
• कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते.

error: Content is protected !!