ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

पालिका आयुक्त चहल याना ईडीची नोटीस

मुंबई – कोरोना काळात कोवीड सेंटरच्या नियमबाह्य खर्चा प्रकरणी पालिका आयुक्त इकबालसिंग चहल याना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे . चहल सोमवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजार होतील आणि त्यांची चौकशी करण्यात येईल

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२२ पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास येताच पीएमआरडीए चे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरू ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट २०२२ मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला…

आता याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या संदर्भात बीएमसी कडे काही माहिती आणि कागदपत्र मागवले… मात्र बीएमसी कडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नोटीस पाठवली आहे.

error: Content is protected !!