ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भूषण देसाई- शिंदे गटात गेल्याने राजकारण तापले- भाजपचा भूषण देसाईला जोरदार विरोध


मुंबई – सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी आज मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या सोबत कुणीही नव्हते . त्यामुळे अशा माणसाच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे तर भाजप कार्यकर्त्यांनी भूषणच्या शिंदे गटातील प्रवेशाला तीव्र विरोध केलं आहे

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईयांचे पुत्र भूषण देसाई यांनी वडिलांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाला काही तास उलटत नाही तोच विरोध सुरू झाला आहे. गोरेगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे. भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे पत्र लिहीले आहे.
भूषण देसाई यांच्या शिवसेना-शिंदे गटातील प्रवेशामुळे स्थानिक राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भ्रष्ट व्यक्तीमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याची मागणी भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
भूषण सुभाष देसाई हे फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आले असल्याचा आरोप संदीप जाधव यांनी केला. भ्रष्ट आणि मलीन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजप आणि शिवसेनेची युती आहे. त्यामुळे एका मित्राने केलेली एक चूक दोन्ही पक्षांना महागात पडू शकते असेही जाधव यांनी म्हटले.

मुंबई उपनगरातील गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सुभाष देसाई १९९०,२००,२००९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी त्यांचा ४७५६ मतांनी पराभव केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे आता, भाजपने भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याने महापालिका निवडणुकीत काय परिणाम होईल, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!