भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर
दिल्ली – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दोनच महिन्यापूर्वी परळीत ‘मी बहीण प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणुक लढविणार नाही, असे निक्षूण सांगणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याच गळ्यातच अखेर बीड लोकसभेची भाजपच्या उमेदवारीची माळ पडली आहे.
सविस्तर यादी पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्रातले भाजप उमेदवार
नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील
