विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती याचा पत्ता कट ?
मुंबई/विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी भाजपाने आपले तीन उमेदवार घोषित केले आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती संदीप जोशी यांचा पत्ता कट झालेला आहे
विधान परिषदेच्या पाच पैकी एका जागेसाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि अत्यंत निकटवर्ती संदीप जोशी आग्रही होते त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचे समजते परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. भाजपने विधान परिषदेच्या तीन जागांसाठी ज्या नावांची घोषणा केली आहे त्यामध्ये ज्येष्ठ भाजप नेते माधव भंडारी, दादाराव केचे, आणि अमरनाथ राजुरकर यांचा समावेश आहे.विदर्भातून प्रवीण दटके हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागेवर जोशी यांना संधी मिळेल असे वाटले होते .पण त्यांच्या ऐवजी कैचे यांना संधी देण्यात आली आहे.या बदलामुळे मुख्यमंत्र्यांचे नागपूर मधील समर्थक काहीसे नाराज झाले असल्याचे समजत
