होळीच्या सणाला गालबोट चंदीगड भरधाव कारणे नाकाबंदीवरील तिघांना चिरडले दोन पोलिसांसह तिघांचा मृत्यू
चंदीगड/होळीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल देशभर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती मात्र दारूच्या नशेत 100 च्या स्पीडने कार चालवणाऱ्या एका इसमाने नाकाबंदीवरील बॅरीगेट्स तोडून तिघांना चिरडले या दोन पोलिसांचं एका मोबाईल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्या याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे
पंजाब मधील चंदीगड / जीरकपुर हायवेवर काल होळी निमित्त नाकाबंदी होती याच दरम्यान गोविंद नावाच्या एका इसमाने 100 च्या स्पीडने कार चालून नाकाबंदीवर लावलेले काटेरी बॅरॅकेट्स तोडून नाकाबंदीवरील दोन पोलिसांचं रस्त्यावरून जाणाऱ्या मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्याला चिडले यामध्ये कॉन्स्टेबल सुखदर्शन होमगार्ड राजेश आणि मोबाईल कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला याप्रकरणी चंदिगडच्या सेक्टर 31 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक गोविंद हा दारूच्या नशेत होता त्याची मेडिकल करण्यात आली आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गोविंदा कारची तोडमोड केली तसेच त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला सुखरूप पोलीस कस्टडीत पाठवले
