ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

युपीचा माफिया अतिकच्या मुलासह दोघांचे एनकाऊंटर

झाशी – उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला माफिया डॉन अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याचे आज झाशी मध्ये युएटीएसच्या पथकाने एंनकॉउंटर केले. मुलाच्या एंनकॉउंटरचे वृत्त एकूण अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ न्यायालयात ढसाढसा रडले. असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांच्यावर ५ लाखांचे इनाम होते. आत आतिकची पत्नी शाहिस्ता, बहीण नुरी आणि तिच्या दोन मुली तसेच ३ शुटर फरारी आहेत.
प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आज असद अहमदच्या एन्काऊंटरनंतर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला सुरु आहे. माफिया असद अहमद हा फरार होता. यूपी एसटीएफची टीम सतत त्याचा शोध घेत होती. पण प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पण आज त्याला झाशीत जेव्हा पोलिसांनी घेरले. तेव्हा एसटीएफने त्याला सरेंडर करायला सांगितले. पण त्याने त्याने पोलिसांवर गोळीबार केला. डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली झाशीमध्ये दोन्ही आरोपींना गोळ्या घालून ठार करण्यात आले.
माफिया अतिकचा मुलगा चकमकीत ठार झाल्याची बातमी येताच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. लोकं त्यांची स्तुती करत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना म्हटले होते की, माफियांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं हेच विधान सोशल मीडियावर लोकं ट्विट करत आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले होते की, गुन्हेगारांना मातीत गाडून टाकू. उमेश पालच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. आज असद आणि गुलाम यांना पोलिसांनी ठार केले. त्यामुळे सीएम योगींची कणखर प्रतिमा अधिक मजबूत झाली.
उमेश पालच्या हत्येपासून असद हा फरार होता. त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यूपी पोलीस सतत त्याच्या मागावर होते. असदच्या एन्काउंटरची बातमी कळताच अतीक अहमद कोर्टातच रडू लागला.
सोशल मीडियावर लोक यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर वेगवेगळे ट्विट करत आहेत. दुसरीकडे, या चकमकीनंतर उमेश पालच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सरकारने त्यांचा आवाज ऐकला आहे. त्यांना न्याय मिळाला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मारेकऱ्यांना शिक्षा झाली आहे.

error: Content is protected !!