ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

औरंगजेबाच्या कब्रिवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ

मुंबई/ शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आज कुठल्या दिशेने निघाला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात शांतपणे जगू इच्छिणारा माणूस विचारतोय कारण कारण मशिदींवरील भोगांच्या पाठोपाठ आता औरंगजेबाच्या कब्रीचा वाद उफाळून आला आहे
दोन दिवसांपूर्वी एम आय एम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद येथे आले होते .यावेळी ते खुलताबाद येथे गेले आणि त्याने औरंगजेबाच्या कबरीवर फुलांची चादर वाहिली त्याचे हे दुष्कृत्य पाहून महाराष्ट्र संतापला आहे . कारण औरंगजेबाने महाराष्ट्रावर अनन्वित अत्याचार केलेत .छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले 27 वर्ष तो महाराष्ट्रात राहिला पण त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही म्हणून त्याने इथल्या जनतेवर अत्याचार केले शेवटी तो इथेच मेला . मग अशा माणसाची महाराष्ट्रात कबर तरी का ठेवली कारण आता याच कब्रीवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे.म्हणजे औरंगजेबाने जिवंतपणे महाराष्ट्र छळले आणि मेल्यावर सुधा छळत असेल तर त्याची कबर हलवावी आणि या वादावर कायमचा पडदा टाकावा अशी मागणी महाराष्ट्रातील जनता करीत आहे .

error: Content is protected !!