ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

विधान परिषदेच्या निवडणुकीत 11उमेदवार रिंगणात- काँग्रेसचा माघार घेण्यास नकार -पुन्हा होणार घोडेबाजार


मुंबई/राज्यसभा निवडणुकीतील घोडे बाजारामुळे तोंडघशी पडलेल्या महाविकस आघाडीवर विधान परिषदेच्या निवडणुकीतही तशीच वेळ येणार आहे कारण काँग्रेसने आपलं दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसला आहे त्यामुळे या निवडणुकीतही घोडेबाजार अटळ आहे
येत्या 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक आहे या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 तर काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो भाजपचे मात्र 4 उमेदवार निवडून येतील असे असताना काँग्रेसने2 तर भाजपने 6 उमेदवार उभे केले होते यापैकी भाजपच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे भाजपचे 5 उमेदवार मैदानात राहिले परिणामी 10 ऐवजी 11 उमेदवार झाल्याने आता निवडणूक अटळ आहे काँग्रेस कडून भाई जगताप चंद्रकांत हांडोरे,राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे,रामराजे निंबाळकर,शिवसेनेकडून सचिन अहिर,अमाशा पडवी तर भाजप कडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे हे उमेदवार आहेत 11 उमेदवारांना 27 मतांचा कोटा आहे आणि तो पूर्ण करायला भाजप आणि काँग्रेसला घोडे बाजार करावा लागणार आहे

error: Content is protected !!