ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिंदेंच्या जाहिरातींवरून भाजपात नाराजी

.

मुंबई: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर आले, त्यांनी माध्यमांना हात जोडले आणि ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या या सूचक मौनाची सर्वत्र चर्चा आहे..
देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार अशा आशयाची जाहिरात आज राज्यातल्या प्रमुख वृत्तपत्रात छापून आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं. त्यावरुन आता भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी मात्र या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे

error: Content is protected !!