ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

रुग्णालयात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या व सफाई काम ठेकेदाराकडून पालिकेला चुना ! अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे च्या पाहणीत ठेकेदाराचे पितळ उघडकीस

मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी कामगार किती काम करतात जितके कंत्राटी कामगार बिलावर दाखवले जातात तितके कामगार प्रत्यक्षात कामावर हजर नसतात .अशा प्रकारे पालिकेची फसवणूक सुरू असते अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेच्या  बांद्रा येथील के बी भाभा  आणि देसाई रुग्णालयाला भेट दिली असता तिथे जितके कंत्राटी कामगार असायला हवेत तितके नव्हते शिवाय स्वच्छताही दिसत नव्हती. पुरेसे कंत्राटी कामगारांच्या नसल्याने बरीच कामे खोळंबली होती रुग्णालय सारख्या अत्यावश्यक सेवेत अशा प्रकारची कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने पालिकेची फसवणूक होत असेल तर याची चौकशी व्हायलाच हवी.  पालिकेने सफाई आणि हाऊस कीपिंगसाठी के एच एफ एम  होस्पॅलिटी आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीला कंत्राटी कामगार पुरवण्याचे कंत्राट दिले आहे आणि महिन्याला त्याचे लाखोंचे बिल पालिका देते पण प्रत्यक्षत कंपनीकडून फसवणूक सुरू असल्याचे खुद अतिरिक्त आयुक्तांनी पाहिलेले असून आता या कंपनीच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे.
       अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अचानक दौऱ्याने पितळ उघडे झाले आहे. कारवाईचे आदेश दिल्या बाबत रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टर विद्या ठाकूर यांना आमच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीबाबत आणि कारवाईबाबत माहिती विचारली असता त्यांनी थोड्या प्रमाणात त्रुटी कंत्राट कामात आढळल्याची कबूल करून कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

error: Content is protected !!