पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले पालघर नाशिक मध्ये रेड अलर्ट जारी -पुढील 2 दिवस धोक्याचे – शाळा बंद !
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .