कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी———पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण—खळबळजनक
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी
पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण
मुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची अनावश्यक कामे हाती घेण्यात आलीत यापैकीच एक आहे पवई तलावाचे सुशोभीकरण!
पवई तलाव गणेश मूर्ती तसेच देवींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते शिवाय छट पुजा सारख्या धार्मिक कार्यासाठी सुधा या तलावाचा वापर होतो.त्यामुळे पालिकेने शंभर कोटी खर्च करून या तलावाचे सुशोभीकरण आणि स्वच्छता करून याला पर्यटनस्थळाचा रूप देण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी जॉगिंग पार्क,जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच,इतर सेवा सुविधा तसेच संगीताच्या तालावर विद्युत रोषणाई अशा प्रकारचे सुशोभीकरण होणार आहे.शिवाय तलावातील गाळ काढणायासाठी १८ कोटींची वेगळी तरतूद करण्यात येणार आहे.पण हे सगळ आताच का?आज कोरोंनाचे काळात मुंबईकरांना चांगले आणि सुरक्षित आरोग्य देण्याची आवश्यकता आहे कोरोंनाची तिसरी लाट येणार असल्याने तिचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सेवेना जास्तीजास्त निधीची गरज लागणार आहे असे असताना पवई तलावाच्या सुशोभीकरण! घाई का? या सुशोभीकरण नावाखाली मंजूर केलेले १०० कोटी नेमके कोणाच्या घशात जाणार आहेत यात कोरोंनाचे किती भागीदारी आहे असा संतप्त सवाल मुंबईकरांनी केल्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि हा प्रकल्प राबवणाऱ्या कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहेत