स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला–चार दहशतवाद्यांना अटक
स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला
चार दहशतवाद्यांना अटक
स्वातंत्र्य दिनावर दहशत वादाचे सावट
श्रीनगर/ आज देशाचा ७५ वां स्वातंत्र्य दीन आहे मात्र स्वातंत्र्य दिणावर एकाच वेळी दोन मोठ्या संकटांचे सावट आहे एक म्हणजे कोरोनचे संकट आणि दुसरे दहशतवादी हल्ल्याचा धोका दरम्यान स्वातंत्र्य दिनी श्रीनगर मधे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा जैश ए मोहम्मद चवकट होता मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला असून मोठ्या शास्त्र साठ्यासह चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे
काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यामुळे १५ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी तसाच हल्ला होऊ शकतो असा संशय गुप्तचर संघटना होता त्यामुळे संपूर्ण देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जम्मू काश्मीर मध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान जाईश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे काही अतिरेकी जम्मू काश्मीर मध्ये घुसले असून हे दहशतवादी मोटार सायकल आय ई डी वापरून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी त्यांचे नियोजन सुधा सुरू होते त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती या मोहिमेला अखेर यश आले आणि चार दहशत वाद्यांना पोलिसांनी पुंच सेक्टर मधून अटक केली. त्यामुळे मोठा दहशतवादी हल्ल्याच्या कट फसला असून या दहशतवाद्यांचे आणखी काही साथीदार भारतात इतर राज्यांमध्ये घुसले असावेत असा गुप्तचर संघटनांना संशय असून काल देशभर छापेमारी सुरू होती. दरम्यान कोरोनाचेही संकट कायम असल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार असून कोणतेही मोठे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत असे यापूर्वीच सरकारने स्पष्ट केले आहे.