ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पवार काका -पुतण्याची भेट चर्चाना उधाण


मुंबई – अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आलं किंवा मी कुणाला भेटायला बोलावलं, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे
राष्ट्रवादी पक्ष कधीच भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवारांनी दिलं आहे. राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आल्याचं शरद पवारांनी सांगितलं. मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये 1 सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, यात पुढील रणनीतीविषयी चर्चा होणार असल्याचं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 35 ते 40 नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले.
विरोधकांच्या इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे, सामान्य जनतेला हे आवडत नसून त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असं देखील शरद पवार म्हणाले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना नोटिसा पाठवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. जनता लवकरच महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देईल, असंही शरद पवार म्हणाले.

error: Content is protected !!