ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अरे वेड्यानो भाऊबीज परत घेतली जात नाही – लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची विरोधकांवर टीका

जळगाव – लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. तर त्यांनी आमदार रवी राणा व शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची अप्रत्यक्ष कानउघाडणी केली. जळगावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, कुणाचा बापही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याची टीकाही केली. त्यातच महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत, या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं लाच देताय का, कुणी म्हणालं मतं खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणालं की 1500 रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत.असेही ते म्हणाले

error: Content is protected !!