पालिका कर्मचाऱ्यांकडून घर घर तिरंगा फेरीचे आयोजन
मुंबई – पंतप्रधान मोदी यांनी यंदाच्या ७८ व्य स्वातंत्र्य दिनी घर घर तिरंगा या ही मोहीम राबवण्याचे देशवासियांना आव्हान केले आहे . या मोहिमे अंतर्गत देशभर घरघर तिरंगा लावण्यात येणार आहे तसेच सर्वत्र फेऱ्या काढून तिरंग्याचे महत्व लोकांना जपण्याचे आव्हान केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या जी दक्षिण विभागातील पालिका कर्मचाऱ्यांनी घर घर तिरंगा मोहिमेचे आयोजन केले होते .यात पालिका अधिकाऱ्यांपासून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला . या मोहिमेतून पालिका कर्मचाऱ्यांनीही आपले देशप्रेम व तिरंग्या विषयीची आस्था दाखवून दिली
सहाय्यक आयुक्त श्रीमती- मृदूला अंडे, विभाग कार्यकारी अभियंता निवृत्ती गोधंळी आणि कनिष्ठ अभि.ठाकूर, गोसावी इतर अभियंता कर्मचारी यांनी सहभाग घेतला.



