ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट

मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉडरी प्रकरणी इडीने गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली तेंव्हापासून जवळपास 10 महिने देशमुख तुरुंगात आहेत . दरम्यान या प्रकरणाचा तपास सुलतान यांच्याकडे होता आणि ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत परंतु काल अचानक सुलतान यांची बदली करण्यात आली . त्यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली .विशेष म्हणजे सुलतान यांचा कालावधी शिल्लक असताना त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .हा बदल अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो असे बोलले जात आहे .

error: Content is protected !!