अरेच्च्या ! लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी – १२ लबाड भावानी भरले अर्ज
छत्रपती संभाजी नगर – सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु झाले आहेत.छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड जिल्ह्यात चक्क १२ जणांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यावर महिलांचा फोटो लावला पण इतर कागदपत्र स्वतःच्या नावाची असल्याने ते पक्स्डले गेले . त्यामुळे या लबाड भावांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला 30सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. त्यात 12 भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले.
काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल 30 अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचं उघड झाले होते. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडवली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी असे अर्ज केल्याचा अंदाज आ
अजित पवार म्हणाले की, बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेऊ इच्छितात. हे लक्षात घ्या, तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळेच पाहिजे असेल तर सरकारची तिजोरी खाली होईल. मग ब्रह्मदेव आला तरी शक्य नाही. पुढे ते म्हणाले, एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग, असा थेट इशाराच त्यांनी दिला आ
शंभूराज देसाई म्हणाले की, कन्नडमधील त्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. या योजनेतून एकही महिला वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. परंतु बोटावर मोजण्या इतके लोकांनी कन्नडसारखा प्रकार केला आहे. आता त्याची चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे.