ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा मीना वाजपेयी यांचे निधन

                                          मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता,  नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.

error: Content is protected !!